कोरोना विषाणू पीएलए लॅबमधून आलेला आहे आणि या विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठ्या संशोधनातून माणसांना हानी पोहोचवणारा हा विषाणू सापडला आणि तो त्यांनी हेतूपुरस्सर जगभरात पसरवला, असा धक्कादायक खुलासा चीनमधील व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग यान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
कोरोना महामारीच्या आधीपासून चीन तिसर्या महायुद्धाची तयारी करत आहे आणि या महायुद्धासाठी चीनचा कोरोना विषाणूचा वापर करण्याचा कट होता, असा आरोप अमेरिकेने केला होता. त्यास आता पुष्टी मिळाली आहे. जगावर राज्य करण्यासाठी जैविक हत्यार वापरण्याच्या चीनच्या कटाविरुद्धचा पुरावा म्हणून अमेरिकेतील प्रसारमाध्यमांचा अहवाल महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे, असे डॉ. यान यांनी सांगितले. हा विषाणू लॅबमधून आला आहे, हे लोकांना समजले पाहिजे.
जगाची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती नाकारणे आणि त्या जैविक हत्यारांचा वापर करणे हा यामागील उद्देश आहे. विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आणि तो त्यांनी मुद्दाम जगभरात पसरवला. विषाणूचे परिणाम चीनच्या सरकारला माहीत होते. विषाणू प्रसारानंतर काही वेळातच अपेक्षित परिणाम दिसू लागला, असे डॉ. यान म्हणाल्या.
अमेरिकेने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात, हा विषाणू चीनने शत्रुराष्ट्रांची वैद्यकीय व्यवस्था ढासळावी यासाठी पसरवल्याचे नमूद केले आहे. हा दावा खरा असल्याचे डॉ. यान यांनी सांगितले. अनियंत्रित अशा जैविक अस्त्राचा वापर करून वैद्यकीय व्यवस्थेवर हल्ला चढवला गेला. शत्रुराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था ढासळण्यासाठीचा हा प्रयत्न होता.
वुहानमध्ये या विषाणूची गेल्यावर्षी झालेल्या सामुदायिक चाचणीतून गोेंंधळ उडाल्याचे डॉ. यान यांनी म्हटले आहे. दरम्यान, चीनमधील प्रसारमाध्यमांनी अमेरिकेच्या अहवालाला आधार नसल्याचा दावा केला आहे. मात्र, हा खुलासा चुकीचा असल्याचे डॉ. यान म्हणाल्या. चिनी सरकारने या विषाणूचा उत्क्रांतीच्या इतिहासाशी संबंध जोडून पाहायला हवे, असे सांगितले होते. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.