नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरण सुरू आहे. परंतु वॅक्सिन सप्लायमधील (Vaccine Supply) कमतरतेमुळे अनेकांना लस मिळवण्यात समस्या येत आहेत. सर्वसामान्यपणे लस घेण्यासाठी कोविन अॅपवर (Co-WIN) रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. पण अधिक लोकसंख्या आणि धिम्या गतीने सुरू असणाऱ्या लशीच्या सप्लायमुळे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत विलंब होत आहे. लोकांना वॅक्सिनेशनसाठी स्लॉट बुक करण्यासाठी अनेक समस्या येत आहेत. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने युजर्ससाठी इंटरनेटवर असे अनेक पर्याय आहेत, जे वॅक्सिनच्या उपलब्धतेबाबत आणि अपॉईंटमेंट्सबाबत संपूर्ण माहिती देतात.
मीडिया रिपोर्ट्नुसार, Under45.in ही वेबसाईट टेलिग्राम चॅनेल्सच्या माध्यमातून वॅक्सिन स्लॉटची जिल्ह्यानुसार माहिती देते. हे चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तयार केलं आहे. एक दुसरा प्लॅटफॉर्म Getjab.in देखील आहे, जो वॅक्सिनेशन अपडेट्स देण्यासाठी उपयोगी ठरतो. याच्या मदतीने लसीकरणासंबंधी आवश्यक अलर्ट्स ई-मेलवर मिळतात.
त्याशिवाय पेमेंट अॅप पेटीएमवरही (Paytm) वॅक्सिन फाइंडर सुविधेद्वारे मदत होऊ शकते. त्याशिवाय ‘My Government Corona Helpdesk’ वरही युजर्स व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) वॅक्सिनची माहिती मिळवू शकतात. यात केवळ उपलब्ध वॅक्सिन स्लॉटबाबत अलर्ट मिळणार नाही.
10 मेपर्यंत सरकारी आकड्यांनुसार, देशात एकूण 17 कोटी 1 लाख 76 हजार 603 लसीकरण झाले आहेत. त्यापैकी पहिल्या डोसची संख्या 13 कोटी 44 लाख 4 हजार 867 इतकी आहे. तर 3 कोटी 57 लाख 71 हजार 736 दुसऱ्या डोसची संख्या आहे.
सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचंही लसीकरण सुरू केलं. मात्र लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये या वयोगटातील लसीकरण सध्या रद्द करण्यात आलं आहे.