• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यास लसीकरणाचाच पर्याय, तज्ज्ञांचं मत

Media Desk by Media Desk
May 10, 2021
in Featured, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
लस
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आणि तिचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येचे लसीकरण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये नव्याने चार लाख तीन हजार ७३८ जणांना नव्याने करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन कोटी २२ लाख ९६ हजार ४१४वर पोहोचली आहे. त्याच वेळी देशात ४,०९२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्युमुखींची संख्या दोन लाख ४२ हजार ३६२वर पोहोचली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

गेल्या काही महिन्यांपासून बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भयंकर असल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिल्या लाटेला सुरुवात झाली, ती यंदा फेब्रुवारीपर्यंत कायम होती, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचे खापर अन्य म्युटंटवर फोडल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. केंद्र सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार के. विजयराघवन यांनी गेल्या आठवड्यात तिसरी लाट अपरिहार्य असून, तिच्यामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. ‘तिसरी लाट रोखायची असेल, तर अधिक कडक उपाययोजनाआवश्यक आहे.
केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची कशी अंमलबजावणी होते, यावर तिसऱ्या लाटेचे नुकसान अवलंबून आहे,’ असेही मत के. विजयराघवन यांनी व्यक्त केले.

लस घेण्याशिवाय पर्याय नाहीच

काही तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्यायच उरलेला नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांनी लस घेतल्यास त्यांच्या शरिरात निर्माण झालेली प्रतिपिंडे लाटेला रोखण्यासाठी मदत करतील. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक असल्याचेही मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Previous Post

सुस्साट इंटरनेट स्पीड पण 5G मुळे जीवसृष्टीवर संक्रांत? जाणून घ्या या तंत्रज्ञानमुळे काय बदल घडतील

Next Post

वुहानच्या प्रयोगशाळेतच जैविक शस्त्र म्हणून कोरोनाची निर्मिती!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

वुहानच्या प्रयोगशाळेतच जैविक शस्त्र म्हणून कोरोनाची निर्मिती!

cowin website

कोरोना लसीकरणासाठी नोंद करणाऱ्या कोविन ॲपमध्ये मोठा बदल!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.