अकोला : कोरोनाचा विळखा घट्टच होत असून, शनिवार, ८ मे रोजी जिल्ह्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ७८७ झाला आहे. एकाच दिवसात २२ मृत्यूंची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नकोसा विक्रम नोंदविला गेला आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३७९, तर रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये १४४ असे एकूण ५२३ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४५,०३८ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,३४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,९६५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू झाला. यमध्ये कौलखेड येथील ६६ वर्षीय महिला, खडकी येथील ५५ वर्षीय महिला, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील ६१ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६६वर्षीय पुरुष,अपोती बु. येथील ३० वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ८१ वर्षीय पुरुष, खदान येथील ७२ वर्षीय पुरुष, कैलास टेकडी येथील ७० वर्षीय पुरुष, रणपिसे नगर येथील ८२ वर्षीय पुरुष, चोहट्टा बाजार ता.अकोट येथील ६५ वर्षीय महिला, गाडगे नगर येथील ४२ वर्षीय पुरुष, कान्हेरी येथील ५० वर्षीय महिला, लहान उमरी येथील ७७ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५० वर्षीय पुरुष, रेणूका नगर येथील ७८ वर्षीय पुरुष, लहरिया नगर येथील ४७ वर्षीय पुरुष, पारस ता. बाळापूर येथील ६३ वर्षीय महिला, माता नगर येथील ६० वर्षीय महिला, गुलजारपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६० वर्षीय पुरुष, जिल्हा परिषद कॉलनी येथील ७२ वर्षीय महिला, सिटी कोतवालीजवळ येथील ६९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-३३
अकोट- ३७
बाळापूर-३४
तेल्हारा- १४
बार्शी टाकळी- १७
पातूर- ३४
अकोला- २१० (अकोला ग्रामीण-८८, अकोला मनपा क्षेत्र-१२२)
५५० कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८, युनिक हॉस्पीटल येथील सात, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसारे हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुगणालय चार, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फतेमा हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील चार, काले हॉस्पीटल येथील दोन, सोनोने हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४४० अशा एकूण ५५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,३५३ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५,०३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३७,८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७८७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.