बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली यांनी कोरोनाविरोधातील लढाईत COVID relief मदतीचा हात पुढे केला आहे. विराट-अनुष्काने गरजूंच्या मदतीसाठी पैसे जमवण्याची मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी याबद्दलची माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत ‘विरुष्का’ने तब्बल दोन कोटी रुपये गरजूंच्या मदतीसाठी दिले आहेत. या उपक्रमाच्या साहाय्याने हे दोघं सात कोटी रुपयांपर्यंतची मदत गोळा करणार आहेत. या मोहिमेमुळे जमा झालेली रक्कम ही ऑक्सिजन पुरवटा, औषधोपचार, लशींबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि इतर वैद्यकिय सुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ( अनुष्का शर्मा and विराट कोहली donate Rs 2 crore for COVID relief)
“भारत सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अनेक गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. आपण सर्वांनी मिळून गरजूंची मदत करण्याची ही वेळ आहे. विराट आणि मी या परिस्थितीने फार दु:खी असून आमच्या परीने जमेल तितकी मदत करण्याचं ठरवलं आहे. यासाठी आम्ही ही मोहिम राबवत आहोत”, असं अनुष्का म्हणाली. “देशाला सध्या आपली सर्वाधिक गरज आहे. यामुळे आम्ही या मोहिमेअंतर्गत शक्य तितका पैसा गोळा करत आहोत. आपण सर्वांनी एकत्र मिळून मदत केल्यास, कोरोनावर मात करू शकू”, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला.
वाचा: कोरोना काळात मदतीला धावली जॅकलीन फर्नांडीस.
अनुष्का-विराटप्रमाणेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेत मदत केली आहे. काहींनी वैद्यकिय सुविधा पुरवत तर काहींनी आर्थिक मदत करत खारीचा वाटा उचलला आहे.