• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लग्न ठरलं, मुलीचं बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलणं खटकलं, होणाऱ्या पतीने तिच्या प्रियकराचा जीवच घेतला

Team by Team
May 5, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
crime news
19
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

राजस्थानच्या जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं. मात्र, त्याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं. तिच्या प्रेम संबंधाची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर आरोपीने संतापात मुलीच्या प्रियकराची निघृणपणे हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे (Youth killed his bride boyfriend in Jodhpur).

नेमकं काय घडलं?

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जोधपूरच्या चौपासनी पोलीस ठाणे हद्दीत संबंधित घटना घडली. आरोपी टहला भीलचं नुकतंच एका मुलीसोबत लग्न ठरलं. मात्र, त्या तरुणीचे नरेश भील या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. याच गोष्टीची माहिती टहला भील याला मिळाली. टहला याने सुरुवातीला नरेश याला बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलीवर नरेशचं प्रेम आहे तिच्याशी आपलं लग्न ठरलंय. त्यामुळे नरेशने आता तिचा नाद सोडावा, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा दमही टहलाने दिला होता.

आधी वाद, हाणामारी नंतर हत्या

दोन-चार वेळा प्रेमात समजावून सांगून, नंतर दम देऊनही नरेश हा मुलीसोबत फोनवर बोलायचा. याच गोष्टीचा टहला याला प्रचंड राग आला. याच मुद्द्यावरुन नरेश आणि टहला यांच्यात शनिवारी (4 मे) प्रचंड वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की दोघांच्या तोंडातून शिवगाळ सुरु झाली. त्यानंतर दोघांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोकांनी मध्यस्थी करत दोघांना अडवलं. मात्र, टहलाने नरेशचा काटा काढण्याचा जणू काही निश्चियच केला होता.

क्लिनीकमध्ये घुसून हत्या

टहलला मंगळवारी दुपारनंतर नरेश हा चौपासनी हाऊसिंग बोर्डाच्या 18 सेक्टर येथील एका क्लिनीकमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो देखील तिथे दाखल झाला. त्याने क्लिनीकमध्ये घुसून नरेशला लोखंडी सळीने निघृणपणे मारहाण केली. या मारहाणीत नरेशचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

क्लिनीकच्या मालकाने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनेला गांभीर्याने घेऊन तपास सुरु केला. घटनेच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपी टहला भीलला अटक केली (Youth killed his bride boyfriend in Jodhpur).

Tags: crime news
Previous Post

LIC Jeevan Labh : प्रत्येक महिन्याला केवळ 800 रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा, जाणून घ्या

Next Post

प्रेमात आड येणाऱ्या भावी नवऱ्यावर विषप्रयोग; मेहंदीऐवजी तरुणीच्या हातात बेड्या

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अरे देवा! विवाहित महिलेने सासरकडील ९ लोकांच्या जेवणात कालवले विष अन् नणंदेच्या पतीसोबत झाली फरार

प्रेमात आड येणाऱ्या भावी नवऱ्यावर विषप्रयोग; मेहंदीऐवजी तरुणीच्या हातात बेड्या

धक्कादायक ! कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात लहान मुलांन कडुन पॅकिंग

धक्कादायक ! कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात लहान मुलांन कडुन पॅकिंग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.