अकोला – जिल्ह्यातील 26 रुग्णालयांना 454 इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले आहे. रुग्णालयाना वाटप करण्यात आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने वितरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिले.
हॉटेल रिजेन्सी यांना 28, ओझोन हॉस्पीटल 24, सहारा हॉस्पीटल 24, बिहाडे हॉस्पीटल 24, इंदिरा हॉस्पीटल 23, आधार हॉस्पीटल चार, नवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल 27, देशमुख मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल 15, आयकॉन हॉस्पीटल 42, स्कायलार्क हॉस्पीटल सात, हार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल 14, अवघाते हॉस्पीटल 10, देवरा हॉस्पीटल 24, यकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल 21, सुर्यचंद्रा हॉस्पीटल 24, अकोल ॲक्सीडेंट आठ, क्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पीटल येथे पाच, युनिक हॉस्पीटल 14, ठाकरे हॉस्पीटल 14, के.एस. पाटील 22, वोरा क्रिटीकल हॉस्पीटल 20, इनफिनीटी हेल्थ केअर पाच, आधार हॉस्पीटल 26, बबन हॉस्पीटल पाच, उशाई हॉस्पीटल 11 व राजेंद्र सोनोने हॉस्पीटल येथील 13 असे एकूण 454 रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.
रुग्णालयांना रेमडिसीवीर प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीनेच फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेताकडे सादर करुन औषधाचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतेही सबब, दिरंगाई, टाळाटाळा व कसूर होणार नाही यांची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेतांनी घ्यावी.
कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणारे (आरोगयसेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन व परिवहनसह विविध आस्थापना इ.) अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेमडिसीवीरचा 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध विभागाने दिले आहे. रुग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले रेमडिसीवीर इंजेक्शनची यादी akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, औषध व प्रशासन, संबंधित आरोग्य यंत्रणेचे आरोग्य अधिकारी यांनी रेमडिसीवीर औषधीचा योग्य वाटप होत असल्याची खातरजमा करुन अनियमीतता आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.