अकोला : दि.3 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1320 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1064 अहवाल निगेटीव्ह तर 256 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 18 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 131 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 41709(32095+9437+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 256 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 131 असे एकूण पॉझिटीव्ह 387 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 211016 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 208124 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2505 नमुने होते. आजपर्यंत एकूण 210934 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 178839 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
256 पॉझिटिव्ह
दि.3 दिवसभरात २५६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९५ महिला व १६१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३८, अकोट-२७, बाळापूर-चार, तेल्हारा-२५, बार्शी टाकळी-चार, पातूर-३८, अकोला-१२०. (अकोला ग्रामीण-२०, अकोला मनपा क्षेत्र-१००)
दरम्यान काल (दि. 2) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 131 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
18 जणांचा मृत्यू
दि.3 दिवसभरात १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य सिटी कोतवाली येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, वनी रंभापूर येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.२६ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील २७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. संतोष नगर येथील ५३ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच हातगाव ता.मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय महिला रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते,म्हैसपूर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. दहिहांडा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजारी येथील ५० वर्षीय महिला रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, रोहणा येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, सांगळूद येथील ६५ वर्षीय महिला रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, मातोडी येथील ४८ वर्षीय महिला रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, विवरा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते,कोठारी लेआऊट येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला मृतावस्थेत दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात डाबकी रोड येथील १९ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य अकोट येथील २६ वर्षीय महिला असून त्याना दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
438 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि.3 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, आरकेटी महाविद्यालय येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातिमा हॉस्पीटल येथील दोन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील नऊ, स्कायलार्क हॉटेल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील दोन, लोहाणा केअर सेंटर येथील तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३३० असे एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5455 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 41709(32095+9437+177) आहे. त्यात 731 मृत झाले आहेत. तर 35523 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5455 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.