• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर; पालकमंत्र्यांनी केली पाहणी, ऑक्सिजन बेडसहित सज्जता

Team by Team
May 1, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर; पालकमंत्र्यांनी केली पाहणी, ऑक्सिजन बेडसहित सज्जता
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांची सोय असणारे कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या पाहता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरक व्यवस्था करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात आहे. त्याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे नियोजन असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर ऑक्सिजन सुविधेसह सुरु करण्यात येत आहे. सद्यस्थितीत येथे १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ही खाटांची संख्या वाढविता येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री ना. कडू यांनी आज याठिकाणी भेट दिली. या प्रसंगी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हे सेंटर येत्या सोमवार पासून कार्यान्वित होणार असून त्या दृष्टीने करण्यात आलेल्या सज्जतेचा पालकमंत्री ना. कडू यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.

हे पण वाचा : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू

जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरचीही पाहणी

तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन सभागृहात सुरु केलेल्या कोविड सेंटरचीही पाहणी केली.

कन्टेनमेंट झोनची पाहणी

कोविड बाधीत रुग्णांच्या संख्या अधिक असणाऱ्या भागास कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जाते. अशा उमरी येथील भागात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी एका पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या घराच्या बाहेरुन घरातील व्यक्तिंशी संवाद साधून चर्चा केली. त्यांना जाणवणाऱ्या अडचणी, उपचार सुविधांबाबत विचारपूस केली. तसेच ज्या घरात पॉझिटीव्ह रुग्ण आहेत अशा कुटुंबांना अन्न धान्य मोफत व घरपोच पोहोचविण्याबाबत व्यवस्था प्रशासनाने करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Tags: Covid Health Center at Punjabrao Deshmukh Agricultural Universityकोविड हेल्थ सेंटर
Previous Post

भाकप आयटकच्या ८३६ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला

Next Post

Akola Corona Update: 368 पॉझिटीव्ह, 470 डिस्चार्ज, 13 मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona covid 19

Akola Corona Update: 368 पॉझिटीव्ह, 470 डिस्चार्ज, 13 मृत्यू

चाचणी

अकोल्यात 376 पॉझिटीव्ह, 446 डिस्चार्ज, 11 मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.