• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला: कोविड हेल्थ केअर सेंटर साठी पाच कोटी निधी; ३२० खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचीही सुविधा

Team by Team
May 1, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला: कोविड हेल्थ केअर सेंटर साठी पाच कोटी  निधी; ३२० खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचीही सुविधा
15
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१ (जिमाका)- जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यात तब्बल ३२० खाटांची सुविधा असलेले कोविड हेल्थ केअर सेंटर्स तसेच ऑक्सिजन सुविधा, आवश्यक औषधी व अन्य उपचार सुविधांसाठी पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांची तरतूद करुन प्रशासकीय मान्यताही प्रदान केली आहे.

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्ह्यात  कोविड रुग्णांच्या उपचार सुविधेत प्रशासनाने कोणतीही कमतरता ठेवू नये याबाबत निर्देशीत केले असून त्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करुन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

हे पण वाचा : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू

 त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दीक्षांत सभागृहात २०० खाटा या साठी एक कोटी ४० लक्ष  ९६ हजार रुपये तर  ग्रामिण रुग्णालय अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शी टाकळी येथे  प्रत्येकी ३० खाटांचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे,. या शिवाय मुर्तिजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमला अतिरिक्त जोडणी बसविण्यात येणार आहे. या शिवाय या सर्व कोविड हेल्थ केअर सेंटर येथे  ऑक्सिजन बेड सहित सर्व सुविधांची सज्जता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६० लक्ष २८ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. असा एकूण पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांचा निधी कोविड उपचार सुविधेसाठी देण्यात आला आहे. यात ऑक्सिजन सुविधा, सिलिंडर भरणे,  इत्यादी सुविधांसह रेमडेसेविर सहित अन्य औषधांच्या खरेदीचाही समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात  चार ग्रामिण रुग्णालयात प्रत्येकी २०  प्रमाणे एकूण ८० तर पातूर येथे ५०, पीकेव्ही येथील २०० बेड तर  अकोला जिल्हा परिषदेने स्थापलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटर मधील ५०  अशा तब्बल ३८० ने खाटांची उपलब्धता व उपचार सुविधा निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

कोविडच्या आपत्तीत मदतीचा हात; पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू

Next Post

पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले – एस.एम.देशमुख

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले – एस.एम.देशमुख

पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले - एस.एम.देशमुख

भाकप आयटकच्या ८३६ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला

भाकप आयटकच्या ८३६ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.