देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाचले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पीटलमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे. सोशल मीडियावरुन लोक मदत मागत आहेत. या सर्व गोष्टींची माहिती एकाच वेबसाईवर एकत्र करुन लोकांपर्यंत माहिती काही वेबसाईट पोहोचवत आहेत. यामुळे रुग्णांना फायदा होत आहे. या वेबसाईटवरुन लोकांना ऑक्सिजन, बेड, प्लाज्मा, रेमडेसिवीर इंजेक्शन या सर्व गोष्टींची माहिती मिळते.
सद्या या कोरोना संकटात पाच वेबसाईट महत्वाचे काम करत आहेत. या संकटाच्या काळात या पाच वेबसईचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.
Covidfightclub.org या वेबसाईटवर आपण आपल्या शहराच्या नावाने सर्च बॉक्समध्ये आपली गरज लिहून शोधू शकता. या शिवाय सर्चबाक्स च्या खाली शहर आणि आपली गरज निवडून त्या वस्तुचा विक्रेता शोधू शकता. आपल्याला सेवा देणारी मिळतील. यासह त्यांचा मोबाईल नंबर, पत्ताही माहिती मिळेल. ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केलेली असते. ही पोस्ट कधी केली आहे याची माहितीही मिळते.
Covid.army ही वेबसाईट सुद्धा आहे. यात अगोदर आपले शहर निवडावे लागेल. यानंतर आपली गरज दोन्ही फिल्टर लावताच आपल्यालाला आपल्या कामाचे ट्विट दिसायला लागतील. जे आपल्या कामाची असतील. सर्चमध्ये अलीकडच्या पोस्ट पहिल्यांदा दाखवले जातील.
Covid19helpindia.in या वेबसाईटवर तुम्हाला डाव्या बाजूला सर्च बॉक्स दिसेल. यासह शहराचे नाव त्यासह रुग्णवाहिका, डॉक्टर, प्लाझ्मा, औषध, यांची यादी मिळेल. आपण आपल्या गरजेची वस्तु शोधू शकतो किंवा सर्च बॉक्समध्ये सर्च करु शकता. यानंतर सर्व यादी मिळेल. यावरुन आपण मदत घेऊ शकता.
वाचा : रिलायन्स आणि टाटानंतर आता मारुतीही बनवणार ऑक्सिजन
Covidtools.in ही वेबसाईट सुरु करताच पहिल्यांदा आपल्याला गरज असलेली वस्तु निवडावी लागणार आहे. यानंतर आपल्याला प्रत्येक शहरातील मदत पोहचवणाऱ्यांची यादी मिळेल. सर्च बॉक्समध्ये आपल्या शहराचे नाव टाकावे लागणार आहे. यात आपल्या शहरातील संपर्क मिळतील. यात शेवटची माहिती कधी अपडेट केली याची वेळही मिळेल. यात आपणही माहिती अपडेट करु शकतो.
Covidwin.in ही वेबसाईट सगळ्यात सोपी आहे. यात आपल्याला राज्य निवडावे लागणार आहे. त्यानंतर आपले शहर किंवा जिल्हा निवडावा लागणार आहे. यानंतर आपल्याला गरज असलेल्या वस्तुचे नाव निवडायचे आहे. आपलेल्या गरजेच्या वस्तुंची यादी मिळेल. यात त्या वस्तु पुरवणाऱ्या लोकांचे संपर्क मिळणार आहेत.
या सर्व वेबसाईटवर माहिती सोशल मीडियावरील पोस्टवरुन आली आहे. या माहितीची खात्री करुनच पुढ पैशाची देवाण घेवाण करा. कारण या कोरोना महामारीतही पैसे लुटनाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे याची सत्यता तपासुनच पुढच पाऊल टाका.