अकोला : दि.28 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2007 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1738 अहवाल निगेटीव्ह तर 269 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 728 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 13 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 139 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 38951(30255+8519+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 269 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 139 असे एकूण पॉझिटीव्ह 408 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 201805 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 198949 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2469 नमुने होते. आजपर्यंत एकूण 201755 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 171500 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
269 पॉझिटिव्ह
दि.28 दिवसभरात २६९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १०९ महिला व १६० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-दोन, अकोट-१०, बाळापूर-२५, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-६३, पातूर-२८, अकोला-१३६. (अकोला ग्रामीण-२६, अकोला मनपा क्षेत्र-११०)
दरम्यान काल (दि. 27) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 139 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
13 जणांचा मृत्यू
दि.28 दिवसभरात १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य जूने शहर येथील ६८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, येलवन ता. बार्शीटाकळी येथील २९ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, गौतम नगर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. बेलुरा उमरा ता.अकोट येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते,चोहट्टा बाजार ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच केशव नगर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, एमआयडीसी नं.४ शिवणी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पाच जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात उमरी ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष असून त्याना दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य कोळंबी ता. मुर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर येथील २९ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील ६० वर्षीय पुरुष असून त्याना दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, शास्त्री नगर येथील ७८ वर्षीय महिला असून त्याना दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
728 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि.28 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील ११, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, यकीन हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, देवसार हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६१५ असे एकूण ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5020 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 38951(30255+8519+177) आहे. त्यात 668 मृत झाले आहेत. तर 33263 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5020 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.