अकोला(प्रतिनिधी) – सिव्हील लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मधील न्यू तापडिया नगर, खरप, पंचशील नगर व दुबे वाडी या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गेल्या वर्षभरात अत्यंत निर्दयपणे 3 हत्या या परिसरात झाल्या असून त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन ते न्यू तापडिया नगर मधील अंतर अधिक असल्याने तसेच यादरम्यान रेल्वे फाटक असल्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास अधिक वेळ लागतो त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी आधार फाउंडेशन च्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली.
हे पण वाचा: अकोट वर्तुळ क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड करू वाहतूक करणारी टोळी गजाआड,तीन आरोपीना अटक
या अगोदर देखील सात-आठ वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर पोलीस चौकी साठी मोर्चा काढला होता त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेंद्रजी मिश्र यांनी या भागात पोलीस चौकी स्थापन केली होती परंतु 1 वर्षातच ती बंद करण्यात आली मात्र सध्या या भागातील लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली असून या बाबीचा विचार करून पुन्हा या भागात एक स्वतंत्र व कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी आधार फाउंडेशन चे अध्यक्ष माणिक शेळके, राहुल ठाकूर, किशोर ठाकरे, गौरव पांडे, गोविंद सूर्यवंशी, सुशील ठाकरे आदि आधार फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.