मुंबई : मुंब्रा येथील प्राईम हॉस्पिटलला पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदतकार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
राज्यात रुग्णायलयांना आग लागण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रुग्णालयात १७ रुग्ण दाखल होते त्यातील ४ जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्यावतीने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाकडे जात आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हे पण वाचा : आईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशी, कुणीही फिरकले नाही
दरम्यान, आगीत मृ्त्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील १ लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.