अकोट (शिवा मगर)-अकोट वर्तुळ मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड असल्याची खात्री वन विभागाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मिळाली मिळालेला गोपनीय माहिती नुसार अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बाब समोर आल्यामुळे वन विभागाने सापळा रचून अकोट मधील हिवरखेड रोड लगत गाजी प्लॉट असलेल्या येथून अवैधरित्या वाहतूक करताना टाटा कंपनीचा 407 ट्रक वाहन क्र MH 43 E 6063 नीम पेरी मालासह जप्त केले तसेच अकोट अकोला रोड वरील दहीहंडा फाटा लगत टाटा कंपनी चा माल वाहक क्र MH 40 Y 1970 थांबून पाहणी केली असता अवैध वृक्षतोड असल्याची बाब समजल्यामुळे वाहन जप्त करण्यात आले व अकोट शहरा लगत, टाटा कंपनीचा 407 ट्रक क्र MH 04 U 3505 जप्त करून 3 वाहनावरील वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले सदर जप्त वाहनावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42 नुसार ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली तसेच सदर वाहनांची दस्तावेजांची पडताळणी व कसून चौकशी करण्यात येत आहे सदर कारवाई के.आर.अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वन विभाग अकोला अ. सु. वळोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वन विभाग अकोला आर.एन.ओवे.वनपरिक्षेत्र अधिकारी. प्रादेशिक अकोला वनविभागा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली. ए. एन.बावणे वनपरिमंडल अधिकारी अकोट जी.पी.घुडे. वनरक्षक
हे पण वाचा : आईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशी, कुणीही फिरकले नाही