• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Ravinda Jadeja लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

Media Desk by Media Desk
April 27, 2021
in Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
Ravinda Jadeja
29
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravinda Jadeja) याची फटकेबाजी पाहून तो किती निर्दयी आहे, असे RCBच्या फॉलोअर्सना नक्की वाटले असेल. २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट, अशी दमदार कामगिरी जडेजानं केली. खरं तर त्याला सर जडेजाच म्हणायला हवं. मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या जडेजानं लॉकडाऊनच्या काळात मोठी समाजसेवा केली आहे आणि याची चुणूकही कोणाला होऊ दिली नाही. त्याचं हे समाजकार्य अजूनही सुरू आहे आणि त्याची बहिण नयना हिनं जड्डूचं कार्य जगासमोर आणलं आहे.

Ravinda Jadeja लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न पोहोचवण्यापासून ते कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे ते त्यांचा उपचाराचा खर्च उचलण्याचं काम केलं आहे. सौराष्ट्रच्या स्टार क्रिकेटपटूची बहिण नयना हिनं ‘एबीपी लाईव्ह’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात आम्ही राजकोटमधील अनेक गरजूंच्या घरी रेशन देण्याची व्यवस्था केली. जड्डू स्वतःहून जात नाही. त्याला पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी जमते म्हणून तो कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही आणि आमच्या टीमने घरोघरी अन्नाच्या वस्तू पोहचवल्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट भारताला आली आहे. बेड नाहीत, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा नाही. अशात पुन्हा एकदा जडेजा व नयना मदतीसाठी पुढे आले आहेत. ”यावेळी समस्या थोडी वेगळी आहे. लोक काम करत असतील. परंतु कोरोना रुग्णांना उपचार घेता येत नाही, कुठेही बेड नाहीत, ऑक्सिजन किंवा औषध नाहीत, ही बातमी मिळताच आम्ही मदतीसाठी धावून जातोय. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून ते ऑक्सिजनच्या शोधापर्यंत आम्ही मदत करतोय,” असे नयनानं सांगितले.

राजकोट शहराच्या मध्यभागी जडेजाचे ‘जड्डूस फूड फील्ड’ हे रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये २५ कर्मचारी कामाला आहेत. त्यातील बहुतेक जण घरी गेले. नयनानं सांगितलं की, ”कुणाचे घर उत्तराखंडमध्ये आहे, कुणाचे नेपाळमध्ये. या सर्वांना जडेजा प्रत्येक महिन्याला पैसे पोहोचवत आहे. जड्डूला प्रसिद्धी नको आहे. तो शांतपणे करतो.”

Tags: Ravinda Jadeja
Previous Post

भल्याभल्यांना जे जमत नाही ते पठ्ठ्यानं केलं, दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या बायकोचं थेट लग्न लावून दिलं!

Next Post

मागच्या सहा दिवसांत २६ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
एसटी

मागच्या सहा दिवसांत २६ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

भारत बायोटेक कंपनीला नाकातून देता येणारी करोना लसीच्या चाचण्यांना परवानगी

अकोल्यात नागरिकांमध्ये लस संपण्याची भीती, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.