मुंबई : व्हॉटस्अॅप ग्रुपवर कोणी काहीही मेसेज टाकले म्हणून त्याला ग्रुप अॅडमिन जबाबदार ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. व्हॉटस्अॅपवर आलेला मेसेज बेकायदेशीर, अथवा मेसेजमागे आक्षेपार्ह सामाईक हेतू स्पष्ट होत नसेल तर अॅडमिनला दोषी धरता येणार नसल्याचे न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बी. बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले..
गोंदिया जिल्ह्यातील व्हॉटस्अॅप ग्रुपच्या 33 वर्षीय अॅडमिनविरोधात जुलै 2016 मध्ये लैंगिक छळवणूक तसेच इतर आरोपांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने ग्रुपच्या महिला सदस्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला होता. त्याप्रकरणी ग्रुप अॅडमिनलाही जबाबदार धरण्यात आले होते.
महिला सदस्यांविषयी असभ्य भाषा वापरणार्या सदस्यावर कारवाई न केल्याप्रकरणी गु्रप अॅडमिनविरोधात गोंदियाच्या महानगर न्यायदंडाधिकार्यांपुढे आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, अॅडमिनने उच्च न्यायालयात घाव घेऊन गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बी. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय खंडपीठाने दिला.