अकोला : प्रभाग क्रमांक 18 मध्ये कमला नगर मधे मुख्य रस्त्यावरील नळ पाईप लाईन लीक झालेली आहे महानगर पालिकेच्या कर्मचारी यांनी रस्त्याच्या कडेला मोठं मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत लोकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे तक्रार करून 6 महीने उलटले तरी तरीही ही पाइपलाइन अद्याप पर्यंत दुरूस्ती करण्यात आली नाही तक्रार करून देखील महानगर पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे लोकांना नळाद्वारे गटारी मधले पाणी येत आहे महानगर पालिकेच्या कर्मचारी घ्या हलगर्जीपणा मुळे लोकांना गटारी मधले पाणी पिण्याची वेळ आली आहे महानगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर हे पाइपलाइन ठीक करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी उमेश इंगळे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण युवा संघटना अकोला यांनी केली आहे