कोरोनामुळे संपूर्ण देश अतिशय बिकट परीस्तीतीतून जात आहे. आग्राच्या ब्रज भागातून हृदयविकारक चित्र समोर आले आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स मिळत नसल्यामुळे मुलाने आपल्या पिताचा मृतदेह स्वतःच्या कारच्या छतावर बांधला आणि बैकुंठधाम पोहोचला.
पित्याच्या अंत्यविधीसाठी मुलगा अखेरपर्यंत तासन्तासतेथे थांबला पण अंत्यविधीसाठी कोणीच नातेवाईक आले नाहीत आणि काही तासांनंतर, त्याने आपल्या वडिलांचा मृतदेह गाडीच्या छतावरून काढला आणि एकट्यानेच वडिलांचा अंत्यविधी पूर्ण केली.
हे दृश्य पाहून तेथे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले खरोखर ही काय संकट आले देशावर अशी स्थतीती होईल याचा कधी स्वप्नात देखील विचार केला नाहोता .