अकोट (शिवा मगर)-राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोनावर आळा घालण्याकरिता वेळोवेळी निर्बंध आणले.प्रवाशी वाहतूक सेवा मध्ये आवश्यक सेवा करिता प्रवास करणाऱ्या करिता आसन क्षमतेच्या ५०टक्के प्रवासी वाहतूक करण्यास सूट दिली असताना सुधा अकोला ते अकोट खासगी प्रवासी वाहतूक बस मधुन रोज क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक होताना दिसुन येत आहे.ही पोलिस प्रशासनाच्या डोळ्या समोर घडत असताना सुधा याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यामुळे कोरोनाचा प्रसार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर होत आहे. लग्न समारंभाला २५ नागरिकांची परवानगी, मात्र प्रवाशी वाहतूक वर निर्बंध का नाहीत असा प्रश्न जनतेच्या मनात चालू आहे. पोलिस प्रशासन या वर काय कारवाई करणार या कडे जनतेचे लक्ष वेधून आहे.
हे पण वाचा : शेगावात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,कॉल गर्लसह तीन आंबटशौकीन ताब्यात