कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात एक मोठे आरोग्य संकट निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध नाही, परिस्थिती इतकी बिघडली आहे की स्मशानभूमीतही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला नंबर लागले आहेत. तसेच ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थिती आरोग्य मंत्रालयाने काही टीप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण घरच्या घरी शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारली जाऊ शकते.
Proning as an aid to help you breathe better during #COVID19 pic.twitter.com/FCr59v1AST
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 22, 2021
असाच एक प्रोनिंग पद्धतीने श्वास घेण्याचा व्हिडीओ सध्या व्हाईरल होत आहे. त्या मध्ये दावा करण्यात आला आहे की तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेली असली तरी विशिष्ट प्रकारे प्रोनिंग पद्धतीने श्वासोच्छवास घेतल्यास फायदा होता. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. आपला दावा सिद्ध करण्यासाठी या व्हिडीओतील व्यक्तीने आपल्या बोटावर ऑक्सिमीटर लावून शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणारा बदल दाखवला आहे. तसेच केवळ 1 मिनिटं प्रोनिंग पद्धतीने श्वास घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यावरुन 99 टक्क्यांपर्यंत वाढते असं म्हटलं आहे.
प्रोनिंग पद्धतीप्रमाणे ऑक्सिजनची पातळी कशी वाढवावी?
प्रोनिंगच्या या व्हिडीओत सांगण्यात आलंय की शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी संबंधित व्यक्तीने पोटावर झोपावं. पोटावर झोपताना पायांखाली आणि मानेखाली उशी घ्यावी. यानंतर दीर्घ आणि खोलवर श्वास घेऊन सोडावा. असं 1 मिनिटे केलं तरी शरीरातील ऑक्सिजन पातळी 99 टक्क्यांपर्यंत वाढते.
#PronePosition helps raise #Oxygen levels in body.
Pls watch and help yourself.@ndtv @ndtvindia @AshishSinghLIVE @aajtak @IndiaToday @indiatvnews @SudarshanNewsTV @PTC_Network @thewire_in pic.twitter.com/ge6NqptWt5
— Rupin Sharma IPS (@rupin1992) April 20, 2021
या व्यक्तींनी करू नका प्रोनिंग –
- डीप वेन थ्राम्बोसिस (48 तासांपेक्षा कमी वेळेत उपचार)
- मेजर कार्डिअॅक कंडीशन्स
- अस्थिर रीढ़, फीमर किंवा पेल्विक फ्रॅक्चर
प्रोनिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा –
- हे जेवणानंतर एक तासापर्यंत करू नका.
- थकल्यानंतर प्रोनिंग करू नका.
- प्रोनिंग करताना दुखापतींकडे लक्ष ठेवा.