राज्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. या काळात तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास लागणार आहे. आणि ई-पास कसा मिळवायचा, यासाठी ही पुढील माहिती वाचा. या खास गोष्टी तुमच्यासाठी…
ई-पास कसा काढायचा? या टिप्स तुमच्यासाठी-
– सर्वप्रथम ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/या वेबसाईटला भेट द्या.
– आधी सर्व सूचना वाचून घ्या.
– apply for a pass here यावर क्लिक करा
– ज्या जिल्ह्यात प्रवास करायचाय तो जिल्हा निवडा.
– जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा, संपूर्ण नाव, प्रवास कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करणार, मोबाईल नंबर नोंदवा.
– प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश नोंद करा.
– वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
– प्रवासाला सुरुवात कोठून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नोदवा.
– आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? उत्तर द्या.
– परतीचा प्रवास याच मार्गानं करणार, उत्तर द्या.
– २०० केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा
– आवश्यक ती कागदपत्रे निवडा.
– अर्ज सादर करा. (submit)
-अर्ज केल्यानंतर एक टोकण आयडी तुम्हाला देण्यात येईल.
– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही टोकण आयडी क्र. नोंदवून ई-पास डाऊनलोड करू घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
– ई-पासची मूळ कॉपी आणि झेरॉक्सही स्वत:कडे ठेवा.
ई-पास कशासाठी मिळेल ?
१) कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह ई-पाससाठी अर्ज करू शकतो.
२) विवाहसोहळा, अत्यावश्यक आरोग्य इर्मजन्सी, अंत्यविधीसाठी ई-पास मिळतो.
३) अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही.