• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

IPL 2021 : आरसीबीने दणदणीत विजयासह दिला धोनीच्या चेन्नईला मोठा धक्का

Media Desk by Media Desk
April 23, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
IPL 2021
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

IPL 2021 आरसबीच्या संघाने आजच्या सामन्यात कमाल केली. देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने यावेळी १० विकेट्स राखत राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. आरसीबेन यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघालाही धक्का दिला आहे.

देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर १० विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह आरसीबीने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या सामन्यापूर्वीच तीन विजयांसह आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान गुण होते, पण नेट रनरेट जास्त असल्यामुळे चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला होता. आजच्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. हा आरसीबीचा चौथा विजय ठरला आणि त्याचबरोबर गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. आठ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

IPL 2021 राजस्थानने यावेळी आरसीबीपुढे विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने एकही विकेट गमावला नाही. देवदत्त पडीक्कलने यावेळी धडाकेबाज शतक साकारले, त्याला यावेळी कोहलीने चांगली साथ दिली. पडीक्कलने यावेळी ५२ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. कोहलीने यावेळी ४७ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७२ धावा केल्या.

राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांच्या फलंदाजांना यावेळी सूर गवसला नाही. राजस्थानची ३ बाद १८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर संजू सॅमसनने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली खरी, पण षटकार ठोकल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. संजूने यावेळी दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या. शिवम दुबे आणि रायन पराग यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी पराग २५ धावांवर आऊट झाला आणि ही त्यांची भागीदारी संपुष्टात आली. पराग बाद झाला असला तरी शिवम चांगली फटकेबाजी करत होता. पण यावेळी शिवमचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. शिवमला यावेळी केन रीचर्डसनने बाद केले. शिवमने यावेळी ३२ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवातियाने यावेळी २३ चेंडूंत ४० धावा केल्यामुळे राजस्थानला १७७ धावा करता आल्या.

Tags: IPL 2021RCB
Previous Post

रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव द्या, पालकमंत्री ना.कडू यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला निर्देश

Next Post

अकोला – ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola

अकोला - 'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली

विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.