अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख उंचावतच असून, २२ एप्रिल रोजी आणखी दहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ६०२ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५४६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १६२ अशा ७०८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांचा आकडा ३६,१४५ वर पोहोचला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३९७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ५४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८९१अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापुर तालुक्यातील ७९, अकोट तालुक्यातील १४, बाळापूर तालुक्यातील सात, तेल्हारा तालुक्यातील १४, बार्शीटाकळी तालुक्यातील ८३, पातूर तालुक्यातील ९७, अकोला ग्रामीण ५४ आणि अकोला मनपा क्षेत्र १९८ अशा एकूण ५४६ रुग्णांचा समावेश आहे.
येथील दहा जण दगावले
डोंगरगीरी येथील ५५ वर्षीय पुरुष
आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष
पत्रकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष
म्हाडा कॉलनी, कौलखेड येथील ६० वर्षीय महिला
तिवसा येथील ४२ वर्षीय पुरुष
चवरे प्लॉट येथील ३१ वर्षीय पुरुष
वाशिम बायपास येथील ७० वर्षीय पुरुष
गायत्री नगर मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुष
शिलोडा येथील ७० वर्षीय पुरुष
श्रावगी प्लॉट येथील ७३ वर्षीय महिला
१२७ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, इंदिरा हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालयातून १३, देवसार हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, मुलाचे वसतीगृह येथील २०, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ४२ असे एकूण १२७ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,१७० उपचाराधिन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६,१४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २९,३७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,१७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.