देशात कोरोनाची दुसर्या लाटेने उसळी घेतली आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर प्राणवायू ऑक्सिजनच मिळत नसल्याने अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशात ऑक्सिजनच्या निर्मितीसह ऑक्सिजन सिलिंडरची कमतरतेची समस्या गंभीर आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यात स्टील उत्पादक कंपन्यांमधील ऑक्सिजन पुरवठा कमी करून रुग्णालयांना द्रव ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच काल अख्या देशाला नाशिकच्या घटनेने हादरुन सोडले. येथील येथील कथडा परिसरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीतील गॅस गळती झाल्याने व्हेंटिलेटरवर असणारे २४ रुग्ण दगावले. त्यामुळे जे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी आग्रही असतात त्यांना ऑक्सिजन सिलिंडरशी संबंधित काही प्रश्न नक्कीच पडत असतील. त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
श्वास घेण्यास त्रास होणे हे कोरोना विषाणूच्या संसर्गाचे एक प्रमुख लक्षण आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना याआधीच्या तुलनेत श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरकडील आकड्यांच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. जेव्हा कोरोना रुग्ण गंभीर टप्प्यावर असतो तेव्हा त्याला श्वास घेण्यात त्रास होतो. यावेळी त्याला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते.
२) पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर म्हणजे काय आणि त्याची किंमत किती असते?
पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर हे लहान आकाराचे असते. एका पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची किंमत किमान ५००० रुपये असते. मात्र पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक कंपनीनुसार त्याच्या किंमती या भिन्न असतात. हे पंप संख्या आणि एकूण व्हॉल्यूमवर अवलंबून असते. पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर वापरण्यास सुलभ आहे. कारण त्यामध्ये बोटाने ऑपरेट करता येणारा वॉल्व्ह आहे.
३) एक सिलिंडर किती काळ टिकतो?
पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर हा २.७ किलो, ३.४ किलो, ४.९ आणि १३.५ किलो क्षमतेचा असतो. पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर हे अनुक्रमे २ तास ४ मिनिटे, ३ तास २७ मिनिटे, ५ तास ४१ मिनिटे आणि १४ तास २१ मिनिटे चालतात.
४) पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर किटमध्ये काय-काय असतं?
पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर किटमध्ये सिलिंडर, वॉल्व्ह, रेग्युलेटर आणि मेडिकल ऑक्सिजनने भरलेला मास्क असतो.
५) ऑक्सिजन सिलिंडर किती वेळात मिळू शकेल?
पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरच्या पुढील वितरणासाठी १० ते १५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. मात्र सध्या देशात आणि राज्यात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर मागणीत अचानक वाढ झाली आहे.
६) पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर कोणाला गरजेचा आहे?
सध्या देशात आणि राज्यात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर मागणीत अचानक वाढ झाली आहे. जे होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत आणि ज्यांना अतिरिक्त वैद्यकीय सहाय्यतेची आवश्यक आहे अशा रूग्णांना पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते.
७) ऑक्सिजनच्या अभावी सरकार काय करत आहे?
देशात वाढत्या कोरोना रूग्णांच्या आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन केंद्र शासनाची प्रत्येक राज्यासाठी ६१७७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याची योजना आहे. त्याशिवाय ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यामातून रेल्वेने ऑक्सिजन कॉरिडॉर किंवा टँकरने ऑक्सिजनची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
८) कसा बनतो ऑक्सिजन?
ऑक्सिजन हा गॅस क्रायोजेनिक डिस्टिलेशन प्रॉसेसने तयार होतो. म्हणजेच, हवेत उपस्थित विविध वायू विभक्त केल्या जातात, त्यातील एक ऑक्सिजन देखील आहे. क्रायोजेनिक डिस्टिलेशन प्रॉसेसने हवा फिल्टर केली जाते, ज्यामुळे धूळ आणि माती काढून टाकली जाते. त्यानंतर तयार आणि जमा झालेला वायू हा उच्च दाबाखाली दाबली जातो. यानंतर उच्च दाबाखाली दाबली वायू मॉलिक्यूलर चाळणीने एड्सॉर्बर केली जातो. यामुळे हवेतील कण, कार्बन डाय ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन विभक्त होतो.
९) देशातील ऑक्सिजन उत्पादन क्षमता किती?
एका अहवालानुसार, देशात ७००० मेट्रिक टनपेक्षा जास्त वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, १२ एप्रिल रोजी भारतात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर ३८४२ मेट्रिक टन होता. हे वैद्यकीय ऑक्सिजनच्या दैनंदिन उत्पादन क्षमतेच्या ५४ टक्के आहे.