नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडूनही काही उपाय-योजना करण्यात येत आहेत. दरम्यान, देशातील वरिष्ठ डॉक्टरांनी कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. यावेळी ऑक्सिजन औषधासारखा असून थांबून-थांबून घेणे फायद्याचे नाही. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कोणत्या प्रकारे उपयोगी आहे किंवा नाही, हे दाखविणारा कोणताही डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे ऑक्सिजनचा सल्ला निरुपयोगी असल्याचे मत या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच, कोरोनाचे (कोविड -१९) ८५ टक्के रुग्ण रेमेडीसवीर इत्यादी विशिष्ट उपचारांशिवाय बरे होत आहेत, असे एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले. (Covid 19 Patients Will Not Benefit From Stopping And Taking Oxygen, Aiims Delhi Director Dr Randeep Guleria)
५-७ दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होतील
डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले, “बहुतेक लोकांना सर्दी, घसा खवखवणे इ. सारखी सामान्य लक्षणे दिसू लागतील आणि पाच ते सात दिवसांत ते उपचारांद्वारे या लक्षणांपासून बरे होतील. केवळ १५ टक्के रुग्णांना आजाराच्या मध्यम टप्प्यात सामोरे जावे लागते. ”
हे पण वाचा : Akola Corona News: 573 पॉझिटीव्ह, 131 डिस्चार्ज, 17 मृत्यू
९४ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन सेच्युरेशन रुग्णांना देखरेखीची गरज
डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, निरोगी लोक, ज्यांचे ऑक्सिजन सेच्युरेशन ९३-९४ टक्के आहे, त्यांना आपले सेचुरेशनला ९८-९९ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी उच्च प्रवाह ऑक्सिजन घेण्याची गरज नाही. ९४ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन रेच्युरेशन असलेल्या लोकांना देखरेखीची आवश्यकता आहे.
याचबरोबर, ते म्हणाले, “ऑक्सिजन एक उपचार आहे. हा एक औषधाप्रमाणे आहे. थांबून-थांबून याचा वापर करणे काही उपयोगाचे नाही. असा कोणताही डेटा नाही, की जो दर्शवतो कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार आहे की नाही. म्हणून हा निरुपयोगी सल्ला आहे.”
योग्य पद्धतीने वापर केल्यास पुरेसा आहे ऑक्सिजन
मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान म्हणाले की, जर आपण ऑक्सिजनचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तर देशात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे आहे. लोकांनी ऑक्सिजन ‘सेफ्टी कवच’ म्हणून वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ऑक्सिजनच्या या अपव्ययांमुळे ज्यांना याची गरज आहे, ते यापासून वंचित राहतील, असेही डॉ. नरेश त्रेहान यांनी म्हटले आहे.