Covid19; 21 एप्रिल: देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. मनोरंजनसृष्टीसह अनेक बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता क्रिकेटर M S Dhoni च्या आई वडिलांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर त्यांनी रांचीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोनीचे वडील पान सिंह (Paan Singh) आणि आई देविका देवी (Devika Devi) यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ऑक्सिजन लेवलदेखील ठीक आहे. त्यामुळे लवकरच हे दोघेही बरे होतील, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
M S Dhoni आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. अशात आज चैन्नईचा कोलकाताच्या टीमसोबत सामना होणार आहे. रात्री साडेसात वाजता हा सामना होणार आहे. चैन्नईच्या संघाचा कर्णधार एम एस धोनी आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या –
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशात आता मंगळवारचे आकडे (Corona Update) चिंतेत आणखीच भर घालणारे आहेत. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर मृतांच्या आकड्यानंही उच्चांक गाठला आहे. मंगळवारी चोवीस तासात तब्बल 2,94,115 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, वर्ल्डोमीटरनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत देशात 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे. पहिल्यांदाच देशात 2 हजारहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.