अकोला : दि.20 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1727 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1446 अहवाल निगेटीव्ह तर 281 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 34683(27117+7389+177)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 281 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 201 असे एकूण पॉझिटीव्ह 482 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 185665 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 182914 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2366 नमुने होते. आजपर्यंत एकूण 185486 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 158369 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
हे पण वाचा : राज्यात आज रात्रीपासून नवी नियमावली; काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती
281 पॉझिटिव्ह
दि.20 दिवसभरात २८१ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १११ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१८, अकोट-पाच, बाळापूर-१६, तेल्हारा-१५, बार्शी टाकळी-नऊ, पातूर-सहा, अकोला-२१२. (अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्र-१७९)
दरम्यान काल (दि. 19) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आठ जणांचा मृत्यू
दि.20 दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खिरपूरी ता.बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खडकी येथील ७५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसांग येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, रिधोरा ता.बाळापूर येथील ७७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील ५३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात पुरुष रुग्णास दि. १९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तसेच रिधोरा ता.बाळापूर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णास दि.११ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
154 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि.20 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, आरकेटी येथून २७, इंदिरा हॉस्पीटल येथून आठ, युनिक हॉस्पीटल येथून दोन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, अकोला ॲक्सीडेंट येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, तर होम आयसोलेशन मधील ४० असे एकूण १५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
4993 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 34683(27117+7389+177) आहे. त्यात 575 मृत झाले आहेत. तर 29115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4993 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.