Covid19; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन;
किशोर नांदलस्कर लोकप्रिय, प्रसिध्द अभिनेते किशोर नांदालस्कर याचे कोरोनाने निधन झाले. त्यांचा थोडक्यात जीवनपट जाणून घेऊया. मराठी सिनेसृष्टीत सुरुवातीपासूनचं त्यांची विनोदी अभिनेते म्हणून ओळख होती. काही अपवादात्मक गंभीर भूमिका साकारल्या होत्या. ‘नवरे सगळे गाढव’ या चित्रपटातील त्यांनी अगदी छोटी भूमिका साकारली होती. किशोर यांनी आत्तापर्यंत ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे.
नाटकांतून सुरुवात
Covid19 किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं. १९६० च्या सुमारास रंगभूमीवरील आमराई या नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. लोकनाट्य लेखक शरद निफाडकर यांच्या ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही नाटके केली. १९८० मध्ये दूरदर्शनवरील काही मालिकांमध्ये ते सहभागी झाले होते.
‘नाना करते प्यार’ हे त्यांचे अखेरचे व्यावसायिक रंगभूमीवरील नाटक ठरले. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातील ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं. यामध्ये प्रभावळकरांची भूमिका किशोर यांनी साकारली होती. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘वन रूम किचन’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’ या व्यावसायिक नाटकात स्मरणीय भूमिका साकारल्या.
‘वन रूम किचन’मधील ‘पितळे मामा’, ‘पाहुणा’मधील ‘नेने’, ‘विच्छा माझी पुरी करा’मधील ‘राजा’ अशा भूमिका गाजल्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर किशोर यांनी पाऊल ठेवले होते. त्यांची अभिनेता गोविंदासोबत जिस देश में गंगा रहता हौ या चित्रपटातील भूमिका गाजली. या चित्रपटात त्यांनी सन्नाटा ही भूमिका साकारली होती.
‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले.