कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ?
आई मुळे बाळाला कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून बाळाला स्तनपान बंद करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र त्यामुळे बाळाला आईच्या दुधापासून आणि त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून दूर रहावे लागते.
देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. लहान मोठे सर्वांनाच कोरोना मोठी धोका संभावतो आहे. लहान जन्मजात बालकांनाही कोरोनाचा मोठा धोका संभवतो आहे. अनेक माता प्रेग्नंसीनंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे आईच जर कोरोना पॉझिटिव्ह आली तर बाळाचे हाल होतात. बऱ्याचदा बाळाला स्तनपान करणे शक्य होत नाही. आईमुळे बाळाला कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून बाळाला स्तनपान बंद करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र त्यामुळे बाळाला आईच्या दुधापासून आणि त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून दूर रहावे लागते.
मग आता आई कोरोना पॉझिटिव्ह असल्यास बाळाला स्तनपान करावे की नाही असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आई आपल्या बाळाला स्तनपान करु शकते, अशे विश्व स्वास्थ संगठनेच्या प्रमुख डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेचेही असे म्हणणे आहे की, आईच्या स्तनपानामुळे बाळ आजारांपासून दूर राहते. योग्य काळजी घेऊन आई बाळाला स्तनपान देऊन शकते. बाळ सहा महिन्यांचे होई पर्यंत स्तनपान बाळाला गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आई जर करोना पॉझिटिव्ह आली तर तिला बाळापासून दूर ठेवावे मात्र आईचे दूध बाळाला देण्याची योग्य सोय करता येऊ शकते. आईचे दूध वेगळे काढून ते बाळाला देता येऊ शकते. त्याचप्रमाणे आई मास्क,ग्लोज घालून योग्य ती काळजी घेऊन बाळाला स्तनपान करु शकते. जर आईची तब्येत गंभीर असेल किंवा तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले असेल मात्र आईचे दूध योग्य प्रमाणात येत असेल तर डॉक्टरांचा योग्य सल्ला व काळजी घेऊन बाळाला आईचे दूध देता येऊ शकते.