• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

Media Desk by Media Desk
September 25, 2021
in Corona Featured, Featured, कोविड १९, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अमरावती: कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली.

अमरावती : कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दरदिवशी कोविड, सारी व इतर आजारांनी ८ ते १३ व्यक्ती दगावत आहेत.  परिणामी अंत्यविधीसाठी हिंदू स्मशान संस्थेच्या प्रशासनावर ताण येत आहे. ओटे उपलब्ध नसल्यास खुल्या जागेवर मृतदेहाचे अंत्यविधी सोपस्कार आटोपले जात आहेत. शुक्रवारी एकूण २६ मृतदेहांवर अंत्यविधी पार पडले.
कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी स्मशानभूमीची पाहणी केली असता, हेच चित्र निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता कोरोना, सारी व इतर आजाराने दगावलेले १६ रुग्ण, तर नैसर्गिकरीत्या दगावलेल्या १० जणांचा अंत्यविधी आटोपला.

एप्रिलमध्ये १५ दिवसांत कोरोनाचे ७५ बळी
एप्रिल महिन्यात कोरोनाने ७५ बळी घेतले. यात १ ते १५ एप्रिलपर्यंतचा समावेश आहे. मृतांमध्ये तरुणांचाही समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. १ ते ९ एप्रिल दरम्यान एक अंकी, तर १० ते १५ एप्रिल दरम्यान कोरोनाने बळींचा आकडा दोन अंकी झाला. शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले असले तरी येथील हिंदू स्मशानभूमीत १६ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शुक्रवारी ६८० संक्रमित, तिघांचा मृत्यू
शुक्रवारी ६८० कोरोना संक्रमित निष्पन्न झाले, तर गत २४ तासांत तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ८४९ नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत ५५,१७७ रुग्ण संक्रमित झाले आहेत. १५१० उपाचारार्थ दाखल आहेत. दिवसभरात १०१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत ५०,२६१ जणांनी कोरोनावर मात केली. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ६९२, तर ग्रामीण भागात १९६२ रुग्ण आहेत. कोरोनाचे आतापर्यंत ७५२ बळी झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ४,१५४, रिकव्हरी रेट ९१.०९ टक्के आहे.

लाकूड ओले, सरण जळण्यास विलंब

हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. ओट्यांची संख्या तोकडी आहे. त्यातच लाकूड ओले असल्याने आधी जमिनीवर डिझेल टाकावे लागते. त्यानंतर सरण जळते. त्यातही बराच वेळ लागतो, असे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

Tags: Maharashtra newsmarathi news
Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: सोमवार दि.१९ पासून ऑनलाईन

Next Post

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

Scholarship

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.