अकोला,दि. १५– कोविड लसीकरण अभियानास चालना देण्यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया च्या वतीने कोविड लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कोविड लसीकरण करणाऱ्या खातेदाराच्या ठेवींवर ०.२५ टक्के जादा व्याजदर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया यांनी दिली. यासाठी ११११ दिवसांसाठी ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’ अंतर्गत ठेव ठेवण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळण्यासही पात्र असतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.