मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन (Quarantine) असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड (Covid positive woman molested) केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने कारवाई करत मेडिकल कोऑर्डिनेटर असलेल्या आरोपीला बेड्या (Medical Co-ordinator arrested) ठोकल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुंबईतील अंधेरी (Andheri, Mumbai) परिसरात घडली आहे. पीडित महिला ही पनवेलची निवासी असून ती अंधेरीतील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. यावेळी तिच्यासोबत मेडिकल कोओर्डिनेटर असलेल्या व्यक्तीने छेडछाड केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
अधिक वाचा : फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या महिलेने त्याला फोन केला तेव्हा हॉटेलमध्ये येऊन बोलू असं सांगून तो काही वेळातच तिथे पोहोचला. आम्ही तुम्हाला असा डिस्चार्ज देऊ शकत नाही, यासाठी आपल्याला डीएमशी बोलावं लागेल असे म्हणून तो निघून गेला. यांनतर काही वेळाने सरफराज तिथे आला. यावेळी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तू रुमबाहेर जावं असं तिने सरफराजला सांगितलं. जर मी तुला डिस्चार्ज मिळवून दिला तर काय करु शकतेस असं म्हणत तो तिची छेड काढू लागला. तसेच त्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी देखील केली. महिलेने याचा विरोध करत त्याच्यापासून सुटका केली.
या दरम्यान, त्या महिलेने म्हटलं की मी याची तक्रार पती, कुटुंबीय आणि हॉटेलच्या लोकांना करणार आहे. यावरून आरोपी सरफराज घाबरला आणि तिला डिस्चार्ज देण्यास तयार झाला. सोबतच तक्रार न करण्याची विनंती देखील केली. या प्रकारावरून महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी सरफराजला कलम ३५४ (अ) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला कोर्टाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.
अधिक वाचा : कंडोम काढून सेक्स करणे पडले महागात; पुरुषावर बलात्काराचा गुन्हा