राज्यात आज रात्री ८ वाजता पासून लॉकडाऊन सुरु होणार आहे. तर या काळात जर आपल्याला विवाह सोहळा साजरा करायचा असेल तर शासनाने दिलेली नियम पाळावे लागतील. आज रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर अनेक गोष्टींवर बंधने आणली जाणार आहेत. विवाहसोहळ्यातील उपस्थितीवरही मार्यादा आणण्यात आल्या आहेत. काय नियम आहेत ते आपण जाणून घेवूया.
कारवाई टाळण्यासाठी कोणते नियम पाळावे लागणार?
1. मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे आवश्यक असेल, अथवा त्यांनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.
2. उपरोक्त पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगले नसल्यास सदर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 1000 रुपये दंड व आस्थापनेकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.
3. एखाद्या ठिकाणी गुन्ह्याची पुनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरेपर्यंत सदर जागा टाळेबंद करण्यात येईल व तेथे कोणत्याही पद्धतीचे संमेलन / एकत्रीकरण आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
4. एखादा विवाह समारंभ धार्मिक प्रार्थनास्थळी आयोजित केल्यास उपरोक्त नियमांच्या अधीन राहून त्यासाठी परवानगी देण्यात येईल.