लुधियाना: पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात भलतीच घटना समोर आली आहे. १०० वर्षांची आजींची एका ७० वर्षांच्या आजोबांनी चक्क छेड काढली. हा बाब आजीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी आजोबांच्या तोंडाला काळं फासलं आणि इतकंच नाही तर, अर्धनग्न करून धिंड काढली. विशेष बाब ही की, संबंधित आजी या छेड काढलेल्या आजोबांची मेव्हणी आहे.
सविस्तर वृत्त असे की, ७० वर्षांचे आजोबा एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमात फुल्ल दारु प्यायली. त्यानंतर घरी परतण्याच्या वाटेला लागले. वाटेतच मेव्हणीचं घर (याच १०० वर्षांचा आजी असून त्यांच्या पतीचं निधन झालं आहे) असल्याने आजोबा घरात शिरले. अंगणात ठेवलेल्या पलंगावर १०० वर्षांच्या आजी झोपलेल्या होत्या. हे ७० वर्षांचे आजोबा आजींच्या अंगावर जाऊन पडले.
हा प्रकार आजींच्या पुतणीने पाहिला, त्यानंतर आरडाओरड करण्यास सुरूवात केली. सर्व जण घराबाहेर आहे. आजींची छेड काढल्याचा आरोप करत नातेवाईंकांनीच ७० वर्षांच्या आजोबांना मारण्यास सुरुवात केली. तोंडाला काळ फासलं. अंगावरची कपडे फाडली. गळ्यामध्ये चपलांचा हार घातला. इतकंच नाही, तर तशाच अर्धनग्न अवस्थेत आजोबांची धिंड काढली.
हे प्रकरण कौटुंबिक असल्यानं आजूबाजूचे कोणीही हस्तक्षेप केला नाही. संबंधित नातेवाईंकांनी पोलिसांची धमकी देत आजींची माफी मागण्यास आजोबांना भाग पाडले. आजोबांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांसमोर आले. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.