तेल्हारा (प्रतिनिधि)-प्राथमीक आरोग्य केंद्र दानापुर अतर्गत येत असलेल्या ईसापुर येथिल नागरीकांना अज्ञात तापाचे थैमान असल्यामुळे ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने दि.१२ एप्रील रोजी कोवीड तपासनी तसेच तापाची तपासनी करण्यासाठी कॅम्प घेण्यात आला.
ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने सरपंच मिराताई बोदडे यांणी गटविकास अधिकारी भारत चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी बारगीरे तालुका आरोग्य अधिकारी चव्हाण यांणा लेखी पञ देवुन आमच्या गावामध्ये कोवीड तपासनी कॅम्प घ्यावा अशी मागणी करताच संमधित अधिकारी यांणी आज ग्रामपंचायत ईसापुर येथे कॕम्प घेतला यावेळी . डॉ व्यवहारे कर्मचारी भाकरे, कानपुरे, तसेच आशा वर्कर अर्चना मोरे हे सर्व तपासनीचे साहीत्य घेवुन हजर होते यावेळी उपसपंच महादेवराव नागे , खंडुजी घाटोळ, पञकार आनंद बोदडे ग्सचिव कु.वर्षा फाळके ग्रामपंचायत कर्मचारी ससाने , मोडोकार हे उपस्थित होते लसीकराणा बाबत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असल्यामुळे या कॕम्पकडे कोणीही फिरकुन सुध्दा पाहीले नाही त्याचे कारण असे कि आजही नागरीकांमध्ये असा सभ्रम निर्माण झालेला आहे कि आपण टेस्ट केल्यास आपण पॉझीटिव्ह निघतो आशी भिती आहे हि भिती दुर करण्यासाठी जनजागारण करणे गरजेचे आहे कारण एखाद्या गावामध्ये जर कोरोना रूग्ण आढळला आणी त्याने आपली तपासनी केली नाही तर त्याचे संपुर्ण कुटुंब आणी तो आणी त्यांचे कुटुंबातील लोक ज्या लोकाँच्या संपर्कात आले असे नागरीक पाॕझीटिव्ह येऊ शकतात आणी संपुर्ण गावातील नागरीक सुध्दा पॉझीटिव्ह येऊ शकतात त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन मार्ग काढावा आणी नागरीकांनी सुध्दा प्रतिसाद दिल्यास हे सकंट दुर होईल