लग्नावर बंदी घाला देशासह सध्या पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. या चर्चेमुळे अनेक लोकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी विकेंड लाकडाऊन जाहीर केल्यामुळे ऐन शनिवारी आणि रविवारी असणाऱ्या मुहूर्तामुळे लग्नसराईचा मोठा गोंधळ उडाला . दरम्यान, सध्या एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडच लग्न थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साद घालताना दिसत आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागील आठवड्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर सर्वांत मोठा गोंधळ उडाला तो लग्न ठरलेल्यांचा. लग्न कधी करायचं ?असा प्रश्न अनेकांना पडला. तर काहींनी नियमाप्रमाणे अवघ्या ५० लोकांच्यात लग्न उरकून घेतले.
मात्र, यासर्वांत एका प्रियकराचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने चक्क मुख्यमंत्री ठाकरे यांच्या लाईव्हला कमेंट करत ”साहेब, लग्नावर बंदी घाला ना.. माझ्या गर्लफ्रेंडचे लग्न आले ओ जवळ” अशी साद घातली आहे. सध्या त्याची ही कमेंट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.