• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पावणे दोन कोटीवर गुटखा जप्त; आकस्मिक कारवाईने गुटखा माफिया धास्तावले

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 12, 2021
in Featured, अकोला, आरोग्य, कोविड १९, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
पावणे दोन कोटीवर गुटखा जप्त; आकस्मिक कारवाईने गुटखा माफिया धास्तावले
12
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला: जिल्ह्यात वर्षभर अन्न व औषध विभागाने प्रतिबंधित गुटखा माफियांवर करण्यात आलेल्या आकस्मिक कारवाईत एक कोटी ७४ लाख रुपायांचा माल जप्त केला. एकूण ४२ कारवाईनंतर २८ जणांवर वर्षभरात खटले दाखल करण्यात आले आहे.

अन्न व मानके कायदा जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्याम शिरसाम, सहायक आयुक्त अन्न सागर तेरकर तसेच पोलीस, नगरपालिका, मनपा विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त अन्न यांनी वर्षभरातील कारवाईची माहिती दिली. प्रतिबंधित गुटखा प्रकरणी ४२ कारवाई करण्यात आल्या असून, एक कोटी ७४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ४२ प्रकरणी गुन्हे दाखल असून २८ जणांवर खटले दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षभरात भेसळयुक्त अवघे १० नमुने
गेल्या वर्षभरात विक्री होणाऱ्या पदार्थांच्या अन्न दर्जा तपासणीसाठी आकस्मिक कारवाई करून २१९ नमुने तपासणी केली. त्यात ७५ नमुने हे दर्जानुसार आढळले. तर अवघे १० नमुने हे निम्न दर्जाची आढळले. यासंदर्भात ९ प्रकरणे प्रलंबित आहेत. भेसळयुक्त म्हणून जप्त केलेल्या मालाची किंमत सात लाख ३५ हजार रुपय इतकी आहेत.

अन्न विक्री आस्थापनांमध्ये वाढ
जिल्ह्यात अन्न विषयक आस्थापनांच्या संख्येमध्ये कोरोना काळात वाढ झाली आहे. त्यात २९४७ आस्थापना या वार्षिक १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या आहेत तर १३ हजार ४३३ या लहान आस्थापना आहेत.

कोविड रुग्णालयातील अन्नाची गुणवत्ता तपासणार
जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अन्य कोविड रुग्णालयात जेथे जेथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशा सर्व ठिकाणी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्ता व दर्जाची तपासणी वेळोवेळी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

नागरिकांनी असावे जागरुक
लोकांमध्ये सेवन करत असलेल्या अन्नाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासोबतच अन्न घटकांबाबतही लोकांनी जागरुक असावे. याबाबत जनजागृती मोहीम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. तालुका व ग्रामीण पातळीवर नगरपालिका व तहसीलदार यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीही त्यांनी समितीकडे सादर कराव्या, जेणे करून संबंधितांवर कारवाई करता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत काहीही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेरकर यांनी केले.

Tags: akola newsGutkha seizedmarathi news
Previous Post

‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Next Post

वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

COVID Tongue: ओठांभोवती पाच लक्षणं जाणवल्यास कोरोना चाचणी नक्की करा

COVID Tongue : ओठांभोवती पाच लक्षणं जाणवल्यास कोरोना चाचणी नक्की करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.