अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २२१५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८९६ अहवाल निगेटीव्ह तर ३१९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नऊ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.१०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३०८२७(२५५९+६०९१+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर(सकाळ)-२०४+आरटीपीसीआर (सायंकाळ)-११५+रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट -८०= ३९९, एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १७२५२५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६९८४३ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२९९ नमुने होते. आजपर्यंत एकूण १७२३९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४७८३५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
३१९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त अहवालानुसार ३१९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी २०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ६२ महिला व १४२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात पारस येथील १६, अकोट येथील १४, कौलखेड येथील १०,पातूर, बाळापूर येथील प्रत्येकी नऊ, मुर्तिजापुर,साहित, गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सात, तेल्हारा येथील सहा, डाबकी रोड, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, शास्त्रीनगर येथील चार, तरोडा खानापुर, एन पी कॉलनी, मलकापूर, लोणी कदमपूर येथील प्रत्येकी तीन, कापशी, गजानन नगर, गोकुळ कॉलनी, कीर्ती नगर, शिवर, लहान उमरी, देऊळगाव, खडकी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित खदान, निम्बि, दहातोंडा, कन्हेरी सरप, नवापूर, चिखलगाव, विझोरा, हिंगणा, आलेगाव, शिवनार, बारालिंग, पास्टुल, देवी खदान, राधाकिसन प्लॉट, तापडीया नगर, न्यू तापडीया नगर, तारफाईल, जठारपेठ, महान, बेलुरा, बार्शी टाकळी, श्रीराम नगर, महसूल कॉलनी, वरुर, वलवाडी, रविनगर, बोरगाव मंजू, अमान खा प्लॉट, साई नगर, आदर्श कॉलनी, रेणूका नगर, कासरखेड, जवाहर नगर, गितानगर, खडकी, बटवाडी, चांदूर, आरोग्य नगर, कासुरा, रणपिसेनगर, गायत्री नगर, बालाजी नगर, चैतन्यवाडी, देशमुख फाईल, जुने शहर, गोडबोले प्लॉट, अनिकट, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत, रजपुत पुरा, बंजारा नगर, अकोट फाईल, तोष्णिवाल ले आऊट, मोठी उमरी आणि उगवा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात ११५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात शास्त्री नगर, जठारपेठ येथील पाच,डाबकी रोड, अकोट, उत्तरा कॉलनी, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, जीएमसी, लहानुमरी, नवोदय विद्यालय बाभुळगाव, मलकापूर, रणपिसे नगर, खडकी, कौलखेड येथील प्रत्येकी तीन, रेडवा,रुईखेड, गोकुळ कॉलनी, रामदास पेठ, विद्यानगर, शिवर, पारड, आळशी प्लॉट, पैलपाडा, सागद, आझाद कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित पारस, जामवसू, वस्तापूर, उजाळेश्वर, टेंभी, टीटवा, आंबोडा, निम्बी मालोकार, अकोली जहागिर, मनबदा, घोडेगाव, खदान, तेल्हारा, पिंजर, गुडघी, गिता नगर, संताजी नगर, सातव चौक, विठ्ठल नगर, जवाहर नगर, तारफाईल, न्यु तापडीया नगर, द्वारका नगरी, हिंगणी बु., राऊतवाडी, रतनलाल प्लॉट, वाडेगाव , समिर नगर, अन्वी मिर्जापूर, बैदपूरा, खेडकर नगर, बोरगाव मंजू, अनिकट, न. पा. कॉलनी, जनुना, उगवा, काजळेश्वर, निम्बा, शिवनी, मुर्तिजापूर, गिरीनगर, बाभुळगाव जहागिर, हिंगणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
दरम्यान काल (दि.१०) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात ८० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवालात करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
नऊ जणांचा मृत्यू
दरम्यान आज नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खडकी येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.३१ मार्च रोजी दाखल केले होते. अन्य खरप येथील ५८ वर्षीय महिला असून या महिलेस दि.६ रोजी दाखल केले होते. अन्य रुग्ण ५४ वर्षीय जठारपेठ येथील पुरुष असून या रुग्णास दि.९ रोजी दाखल केले होते. तर अन्य रुग्ण वाडेगाव ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय महिला असून या महिलेस दि.८ रोजी दाखल केले होते. तसेच अकोट येथील ७५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.७ रोजी दाखल केले होते. डाळंबी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.७ रोजी दाखल केले होते. तर अन्य विवरा ता. पातूर येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.८ रोजी दाखल केले होते. तर अन्य मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला असून दि.९ रोजी दाखल केले होते. तर वाडेगाव ता. बाळापुर येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.७ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
२१९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर देवसर हॉस्पिटल येथून आठ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक. युनिक हॉस्पिटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अवघाटे हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, नवजीवन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून सात, खैर उम्मत हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून सात, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ तर होम आयसोलेशन मधील १४५ अशा एकूण २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
३९०९ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३०८२७(२४५५९+६०९१+१७७) आहे. त्यात ५०८ मृत झाले आहेत. तर २६४१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३९०९ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.