राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु केला असून तर येत्या 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहे. त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र असं असलं तरी मद्य प्रेमींना घरी मद्य मागवता येणार आहे.
मागील वर्षी सुद्धा लॉकडाऊन मध्ये दारूविक्रीसाठी काही प्रमाणात सुत दिली होती, तर उत्पादन शुल्क विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. ग्राहकांना हॉटेल आणि बार मध्ये जाऊन पदार्थ घेण्यास मनाई आहे. मात्र त्यांना आता घरी मद्य मागवता येणार आहेत.
मागच्या वर्षी अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य दुकाने मद्यप्रेमींना बंद झाली होती. तब्बल दीड एक महिना सर्व दुकाने बंद होती. त्याचा मद्यप्रेमींना झटका आणि सरकारला चांगलाच फटका बसला होता. मात्र यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.