दानापूर(सुनिलकुमार धुरडे)-समशान भूमी म्हटली की लोकांच्या समोर येतो तो शेवटचा शन अंत्ययात्रा व त्या अंत्ययात्रेत समाविष्ट झालेले लोक हे असं एकंदरीत चित्र, पडक समशान भूमीचं शेड ,आजूबाजूला समशान शांतता मात्र दानापूर येथिल समशान भूमी या सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव आता आपली वेगळी ओळख करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे. या गावा ची ख्याती आजही पंचक्रोशीत ओळखली जाते.येथिल उत्तरे कडील गरुड धाम (समशान भूमी आपल्या नावाचा डंका पंचक्रीशीत गाजवत आहे .सगळ्या सुविधांनी नटलेली समशान भूमी(गरुड धाम) आज दानापूर सह परिसरातील लोकांची पर्यटन स्थळ म्हणून नावल्यास आली आहे.
रिटायर्ड लोकांनी घडवली समशान भूमी
विविध क्षेत्रातील मित्र एका ठिकाणी येऊन बनवली बनवलं पर्यटन स्थळ. कोणी शिक्षक, लिपिक , पोस्टमन ,चपराशी, महाराज, तर कोणी शेतकरी आशा विविध मित्रांनी एकत्र येऊन कधीही अग मेहनतीचं काम न केलेल्या मित्रांनी हातात कुऱ्हाड विला, फावड घेऊन, श्रमदान करून जे जमेल ते काम व गावकर्यांच्या सहकार्यातून या गरुड धाम (समशान भूमीचं) रुपडं बदलून टाकलं.आज हे गरुड धाम लोकांचं पर्यटन स्थळ बनलं आहे.साडीतीन एकरात वसलेल गरुड धाम(समशंभूमी) उत्तरे कडील गरुड धाम हे साडेतीन एकराच्या परिसरात आहे त्यामुळे येथे श्रमदानातून मोठया प्रमाणावर काम करण्यात आले आहे. विविध झाडाची लागवड. या गरूड धाम (समशान भूमी) मध्ये कडू लिब, पिंपळ, वड ,बाबू, आशा विविध प्रकारच्या जातीचे 290 झाडे लावण्यात आली आहेत.सोबतच फुलांची अतिशय मोहक झाडे दुतर्फा लावण्यात आले आहेत, अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्याची अद्यावत सुविधा, स्टेडीयम बांधण्यात आले आहे.त्याच बरोबर शिवजीची मोठी महाकाय मूर्ती ची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे.
विध्यार्थी येथे करतात अभ्यास कोरोना मुळे आता सर्व शाळा ,महाविद्यालय ,विघालय बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी निसर्ग रम्य वातावरणात अभ्यास करण्यासाठी येतात. लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष तेल्हारा तालुक्यातील काही गावात आजही समशान भूमी नाही प्रेत शेतात जाळवी लागतात मात्र या कडे दुर्लक्ष तर आहेच मात्र ज्या ठिकाणी लोकांनी श्रमदानातून समशान भूमीचे रूपांतर आज पर्यटन स्थळ म्हणून केलं तिथंही सहकार्य तर दूर मात्र साधी एक भेट पण दिली नसल्याने जनतेत नाराजीचा सूर आहे.
स्वच्छतेचा दिला जातो संदेश
या गरुड धाम मध्ये अंत्यविधी करिता आलेल्या लोकांना स्वच्छता राखावी या करिता सूचना फलक व कचरा कुंडी यांचा उपयोग करावा असे सांगण्यात आले आहे.
कोड:आम्ही विविध क्षेत्रातील रिटायर्ड मित्रांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडली ती सगळ्यांना आवडली या गरुड धाम मध्ये या अगोदर काहीच व्यवस्था नव्हती मात्र आज हे लोकांचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जात आहे. हे सर्व गावकऱ्याच्या व सहकार्यातून शक्य झालं.
विश्वासराव विखे
गरुड धाम अध्यक्ष दानापूर..