मुंबई : राज्य बोर्डाच्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता तोंडावर आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचे काय होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले आहे. राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात परीक्षांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दहावी आणि परीक्षांमध्ये कोरोना केसेमध्ये झालेल्या वाढीमुळे मी विद्यार्थी प्रतिनिधी, सर्वपक्षीय प्रतिनिधी, तज्ज्ञ, पालक, शिक्षक आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांशी पर्याय शोधण्यासाठी चर्चा करत आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की, मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालाकांना आश्वस्त करू इच्छिते की, आपली सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही परिस्थितीची पाहणी करत आहोत आणि परीक्षासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल.