अकोला: कोरोना संसर्गाची साखळी; खंडित करण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य सरकारने पाच एप्रिलपासून ब्रेक द चेन अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा भाग म्हणून दर शनिवार व रविवारी संपूर्ण संचारबंदी राहणार असून, ही संचारबंदी शुक्रवार, नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजतापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी सात पर्यंत लोकांना ठोस कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच कोलमडण्याच्या स्थितीत आल्यामुळे राज्य सरकारने पाच एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. सोमवार ते शुक्रवार जिवनावश्यक वस्तु व सेवा वगतळा सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तर शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. याशिवाय दररोज सकाळी सात ते रात्री आठ या कालावधित जमावबंदी म्हणजे पाच पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यास मनाई आहे. सोमवारपासून हे निबंध लागू झाले असून, शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कडक लाॅकडाउन पाळण्यात येणार आहे.या कालावधीत जिवनावश्यक वस्तुंची दुकानेही बंद राहणार असून, लोकांच्या संचारवर बंदी राहणार आहे. कोणत्याही योग्य कारणाशिवाय लोकांना बाहेर पडता येणार नाही. यामध्ये वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले.