अकोला– सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास गुरुवार दि.१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,असे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवरुन अर्ज करण्यास दि.१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे. वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्याची जबाबदार ही संबंधित महाविद्यालयाची असेल. तरी विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी अर्ज भरावे असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.