• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, September 17, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही,त्यांच्या मागण्या आणि सूचनांचा विचार करणार

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मुख्यमंत्री
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहे.मात्र याची अंमलबजावणी होताच या निर्बंधाविरोधात राज्यातील व्यापा-यांनी नाराजी व्यक्त करीत राज्य सरकारलाच अल्टीमेटम दिले आहे.त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी संवाद साधला.लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य असे आवाहन करतानाच,व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत.राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानंतर राज्यातील व्यापारी आणि दुकानदार यांच्यात संभ्रम निर्माण होवून व्यापा-यांनी या निर्बंधांना विरोध केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी,प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य असे आवाहन करतानाच,त्यांच्या मागण्या,सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील.त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.त्यांच्या मागण्या,सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील,असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया,असे आवाहनही केले.

हेही वाचा

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे.कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनीच दिलेल्या माहिती नुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले,या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे – संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसऱा हल्लाही आपल्यावरही झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापुर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापुर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. तुमच्या सूचनांचा स्वीकार केला,तर कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड-चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या येता-जातानाची काळजी घ्या. यात एकमेकाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाय योजना करता येतील, याचा विचार करू. सगळ्याना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही.विषाणूशी लढा आहे.तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या.न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. या सर्वांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात-हात घालून काम करू. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमही काटेकोर पालन होईल, असे उपाय योजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक दि चेनला सहकार्य करू असे सांगितले. यावेळी दिपेन अग्रवाल, जयकृष्ण पाठक, रसेश दोशी, महेश बखाई, निमित शहा, मितेश मोदी, धीरज कोठारी, राजेश शहा, राजेंद्र बठिया,धैर्यशील पाटील, दिलीप कुंभोजकर, संतोष मंडलेचा, वालचंद संचेती आदी उपस्थित होते.

Tags: Maharashtra government
Previous Post

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश

Next Post

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Featured

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

August 29, 2025
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
Featured

आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा

August 29, 2025
Next Post
चाचणी

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

MPSC

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्‍त (पुर्व) परीक्षा: ३३ उपकेंद्र परिसरात दि.११ रोजी प्रतिबंधात्मक आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.