अकोला – जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्या कलम ५(१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच कलम ५(२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कमचाऱ्यांची पुरूष/स्त्री एकुण अशी सांख्यीकी माहीती, प्रत्येक तिमाहीस विहित नमुन्यात नियमीतपणे, राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील मनुष्यबळाची सांख्यिकीय माहिती शुक्रवार दि.३० पर्यंत सादर करावी,असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे की, मार्च २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीची माहिती नमुना ईआर-१ मध्ये संकलित करण्याचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला येथे सुरु आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापुर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहे त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे व माहिती भरावी. यासाठी अंतीम मुदत दि.३० आहे. प्रत्येक आस्थापनेने आपापला नोंदणी तपशील (Employer profile) देखील आवश्यक ती सर्व माहीती नोंदवून तात्काळ अद्यावत करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहीती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी [email protected]/[email protected] यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व ईतर सर्व तपशीलासह संपर्क साधल्यास कार्यालयातून सहकार्य उपलब्ध होईल,असेही कळविण्यात आले आहे.