• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिलासा : लॉकडाऊनमधून ‘या’ घटकांना दिली सूट,आता ही कार्यालये सुरू राहणार

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
मुख्यमंत्री
30
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्यात सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.मात्र राज्य सरकारने नवा आदेश जारी करून काही घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानुसार शासकीय व खासगी सुरक्षा सेवा,फळविक्रेते यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.तर सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,सर्व मायक्रो फायनान्स संस्था,सर्व वकिलांची कार्यालये आता सुरू ठेवता येणार आहेत.

राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि गर्दीची ठिकाणे येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.मात्र राज्य सरकारने या निर्बंधातून काही घटकांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता फळविक्रेते यांना आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहे.तसेच शासकीय व खासगी सुरक्षा सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.राज्य सरकारने ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता,त्यात आणखी काही सेवांचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यामुळे पेट्रोल पंप,आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने,सर्व प्रकारच्या कार्गो सेवा,डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा,शासकीय व खासगी सुरक्षा सेवा,फळविक्रेते यांचा समावेश आवश्यक सेवेत करण्यात आला आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट,डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स,रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था,प्राथमिक डीलर्स,सीसीआयएल, एनपीसीआय,पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,सर्व मायक्रो फायनान्स संस्था,सर्व वकिलांची कार्यालये,कस्टम हाऊस एजंट्स,परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस, औषधी , जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक) या खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार आहे.चाचणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल.१० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणा-या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

Tags: maharahstramaharastra news
Previous Post

वळसे-पाटील यांनी सुरुवातीला गृहमंत्री बनण्याची संधी नाकारली होती …..

Next Post

पश्चिम बंगाल: नेत्याच्या घरात सापडले ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशिन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
पश्चिम बंगाल: नेत्याच्या घरात सापडले ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशिन

पश्चिम बंगाल: नेत्याच्या घरात सापडले ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशिन

शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री; दिलीप वळसे-पाटलांचा राजकीय प्रवास

शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री; दिलीप वळसे-पाटलांचा राजकीय प्रवास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.