मुंबई – सरकारी बँकांमध्ये (Job)नोकरीचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० पदांसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमधून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) जनरलीस्ट अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ६ एप्रिल आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आजचा दिवस संपेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. (Golden opportunity of job in Bank of Maharashtra, hurry up, last chance to apply online today)
या भरती प्रक्रियेत विविध प्रवर्गांसाठी राखीव असलेल्या जागांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
खुला प्रवर्ग – ६२ जागा
ओबीसी – ४० जागा
एससी – २२ जागा
एसटी -११ जागा
ईडब्ल्यूएस प्रवर्ग – १५ जागा
बँक ऑफ महाराष्ट्रमधील भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस २२ मार्चपासून सुरुवात झाली होती. आज ६ एप्रिल ही ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. तसेच ऑनलाइन प्रवेश शुल्क भरण्याचीही ही शेवटची तारीख ६ एप्रिल आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना ४८ हजार १७० ते ६९ हजार ८१० रुपये एवढे दरमहा वेतन मिळणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही २५ वर्षांपासून ३५ वर्षांपर्यंत आहे.
कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी मिळवलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. तसेच कुठल्याही मान्यताप्रात्प संस्थेकडून सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफए, एफआरएम सह तीन वर्षांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गासाठी ११८० रुपये प्रवेश शुल्क आहे. तर एससी, एसटी उमेदवारांसाठी ११८ रुपये एवढे प्रवेश शुल्क आहे. पीडब्ल्यूबीडी आणि महिलांसाठी निशुल्क अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेमधून पात्र उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.