अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अन्य साधारण रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांनाही दिल्या जाणाऱ्या अन्नाविषयी विचारपूस केली. तसेच प्रत्यक्ष स्वयंपाक गृहात जाऊन अन्न धान्य पाहणी केली. अन्नाच्या दर्जात व गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना केल्या.