अकोला : दि.५ दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११२७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १००८अहवाल निगेटीव्ह तर ११९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ५७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे दि.४ रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ८४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९०३४ (२३३६४+५४९३+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आरटिपीसीआर(सकाळ) ११९+ आरटिपीसीआर(सायंकाळ) निरंक+ रॅपिड ८४=२०३ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६२३४१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १५९७०४ फेरतपासणीचे ३७९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२५८ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६२१८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १३८७८० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
११९ पॉझिटिव्ह
आज सकाळी ११९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ८० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पातूर येथील १८, बाळापूर येथील १२, तेल्हारा व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, पतखेड ता.बार्शीटाकळी येथील पाच, जठारपेठ व पारस येथील प्रत्येकी चार, अकोट येथील तीन, टिटवा ता.बार्शीटाकळी, भगीरथ नगर, खडकी, गोरक्षण रोड, मोठी उमरी, जीएमसी, सुधीर कॉलनी, सोपीनाथ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुकळी ता.बार्शीटाकळी, कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी, सहित ता.बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, जूने शहर, हातरुण ता.बाळापूर, मालेगाव बाजार, रुईखेड, शिवपूर, मुकूंद नगर, ग्रामपंचायत अकोला, खदान, अयोध्या नगर, लोनी, शिवार, शंकर नगर, रामदासपेठ, तापडीया नगर, देशमुख फैल, एमआयडीसी, नयागाव, मंगलवारा, जवाहर नगर, भौरद, चोहट्टा बाजार, संताजी नगर, खोलेश्वर, चांदुर, शिवचरण पेठ, गाडगे नगर, सहकार नगर, कपिला नगर, कुरुम, बार्शीटाकळी, जैन चौक, शांती नगर, अडगाव ता.अकोट, सिंधी कॅम्प, पंचशिल नगर, गाडेगाव ता.पातूर, मलकापूर, केळकर हॉस्पीटल, म्हैसपूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ८४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
चौघांचा मृत्यू
आज दिवसभरात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यात सकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात गोलखेडी ता.मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य येलवन ता.बार्शीटाकळी येथील ४९ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी नोंदवलेल्या मृत्यूची माहिती याप्रमाणे- त्यात अकोट फैल, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातूर येथील ७० वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशीमाहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
५७८ जणांचा डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील सात, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, बाईज हॉस्टेल येथील नऊ, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, तर होम आयसोलेशन येथील ५१०, असे एकूण ५७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
३९५७ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९०३४ (२३३६४+५४९३+१७७) आहे. त्यात ४७४ मृत झाले आहेत. तर २४६०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३९५७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.